मराठी भाषा गौरव दिन : राज्यातील विविध बोलीभाषांमध्ये सरकारच्या '100 दिवसांवर 100 शब्द'
मुंबई - भाषा ही आपल्याला मिळालेली एक बहुमूल्य देणगी आहे. भाषेमुळेच आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. राज्यात मराठी सोबतच वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, मालवणी, खान्देशी, आगरी अशा अनेक बोली भाषाही बोलल्या जातात. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने 'जागर मराठीचा' या मालिकेत महाविकास आघाडीच्या सरकारच्या 100 दिवसांवर विविध बोलीभाषेतील कवी, लेखक, साहित्यिक यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. सरकारबद्दल ते काय बोलतायेतत, बघा 'सरकारच्या 100 दिवसांवर 100 शब्द' या विशेष भागात...