कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांना आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येकी ५ लाखांची अर्थिक मदत
जालना - कोरोनामुळे आई-वडील असे दोन्ही पालक गमावलेल्या जालना जिल्ह्यातील दहा मुलांना आरोग्यमंत्री आणि जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. महिला व बाल विकास विभागाच्या योजनेतून ही मदत करण्यात आली. लहान मुलांच्या खात्यावर ही रक्कम फिक्स डिपॉझिट करण्यात आल्यानंतर या डिपॉझिटची रिसीट आणि प्रमाणपत्र आरोग्य मंत्री यांच्या हस्ते लहान मुलांना वाटप करण्यात आले. ज्या मुलांना आई-वडील नाही आणि नातेवाईकही नाही त्यांची व्यवस्था निरीक्षण गृह किंवा बालग्रहात करता येणार आहे, अशा मुलांना मदत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार तत्पर असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हाधिकारी महिला व बालविकास अधिकारी व विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.