गेटवे ऑफ इंडियाचा परिसर पर्यटनासाठी बंद
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असताना नव्याने कडक निर्बंध लादण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील गोष्टी सोडून इतर आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. याच बरोबरच मुंबई शहरात पर्यटनाचे आकर्षणकेंद्र असलेल्या गेट ऑफ इंडियाचा परिसरही पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. एरवी हजारो लोकांची गर्दी असलेल्या गेट वे ऑफ इंडियाचा परिसर शांत झालेला पाहण्यास मिळत आहे. याचा आढावा घेतला ईटीव्हीचे प्रतिनिधी महेश बागल यांनी....