पुण्यातील पिसोळे येथे फर्निचर गोडाऊनला आग; सर्व साहित्य जाळून खाक
पुणे - पुण्यातील पिसोळी येथील दगडे वस्तीत असलेल्या एका लाकडी सामानाच्या (फर्निचर) गोडाउनला भीषण आग लागली होती. या आगीत सर्व साहित्य हे जळून खाक झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्यानंतर पुणे व पीएमआरडीएच्या 14 अग्निशमन वाहन व जवानांच्या साह्याने आग नियंत्रणात आली असून कुलिंगचे काम सुरू आहे. जखमी कोणी नसून या ठिकाणी सर्व साहित्य जळून खाक झाले असून मोठे नुकसान झाले आहे.
Last Updated : Nov 9, 2021, 10:21 AM IST