शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय संबंधित विभाग घेतील - राजेश टोपे
जालना - राज्यांतील शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय संबंधित विभाग स्वतंत्र निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते. कोरोनाची परिस्थिती पाहून स्वतंत्र निर्णय घ्यावा, अशी सूचना तीन दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने दिली होती, अशी माहिती टोपे यांनी दिली.