मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून लॉकडाऊनचे संकेत
मुंबई - गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जिल्हा प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधत लॉकडाऊनचे संकेत दिले. राज्यात कोरोना रुग्णवाढीची परिस्थिती अशीच कायम राहिली तर येत्या एक-दोन दिवसांत आपल्याला कठोर पावले उचलावी लागतील, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. कोरोनाच्या लढाईत राजकारण न आणण्याचे आवाहनही त्यांनी राजकीय पक्षांना केले.