महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Aurangabad Shivaji Maharaj Statue : क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौथऱ्यावर विराजमान, पाहा VIDEO

By

Published : Jan 25, 2022, 12:24 PM IST

औरंगाबाद - अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेला क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अखेर चौथर्‍यावर विराजमान ( Aurangabad Shivaji Maharaj statue ) झाला. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पुतळा बसवण्याची मागणी शिवप्रेमींनी केली ( Demand for installation of statue Shivaji Maharaj ) होती. त्यासाठी काही संघटना आक्रमक देखील झाल्या होत्या. मंगळवारी मध्यरात्री अखेर महाराजांचा 24 फूट उंच असा पुतळा चौथर्‍यावर विराजमान झाला त्या वेळी "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या जय घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. औरंगाबाद शहरातील मुख्य रस्ता असलेल्या क्रांती चौक भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा 1981 मध्ये उभारण्यात आला ( kranti chowk Shivaji Maharaj statue ) होता. त्यानंतर 2012 मध्ये त्या भागात उड्डाणपूल तयार करण्यात आल्याने, महाराजांचा पुतळा पुलाच्या खाली येत होता. त्यामुळे पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी त्या वेळी करण्यात आली. महानगरपालिकेने प्रस्ताव मंजूर केला तरी काम मात्र सुरू झाले नव्हते, शिवभक्तांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि त्यानंतर 2016 च्या सुमारास पुतळा उभारणीला हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर काम सुरू झाले तेही संथ गतीने. अखेर काम पूर्णत्वास आले असून महाराजांचा अश्वारूढ पुतळा चौथऱ्यावर विराजमान झाला आहे. चौकाचे सुशोभिकरण केल्यावर फेब्रुवारी महिन्यात या स्मारकाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details