महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Koregaon-Bhima Shaurya Din : कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला लाखोंच्या संख्येने भीम अनुयायांची मानवंदना

By

Published : Jan 1, 2022, 7:07 PM IST

१ जानेवारी १९२७ रोजी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या पेशवे आणि इंग्रजांच्या लढाईमध्ये (Bhima Koregaon battle ) इंग्रजांनी विजय मिळवला होता. या विजयात महार रेजिमेंटचा मोठा (Koregaon-Bhima Shaurya Din) वाटा होता. त्याचे प्रतीक असलेल्या क्रांतीस्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली होती. त्या वर्षीचा स्मृतिदिन म्हणून आंबेडकरांच्या या मानवंदनेनंतर दरवर्षी १ जानेवारीला मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मानवंदनेसाठी कमी नागरिकांचा सहभाग होता. मात्र यावर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी येथे उपस्थित होते. यावेळी तरुणाई उत्साही होती. मात्र यामध्ये कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसून आले.

ABOUT THE AUTHOR

...view details