पाहा, बंजारा पाड्यावरील होळीतील खास लोकनृत्य
वाशीम - होळीचा सण सगळीकडेच उत्साहात साजरा होत आहे. मात्र त्यातही खास आकर्षण असते बंजारा समाजाच्या होळीचं. होळीतील बंजारा लोकगीतांनी स्थानिक लोकांवर चांगलेच गारुड घातले आहे. बंजारा समाजात होळीचा सण अगदी दिवाळीसारखाच साजरा होतो. लोकगीत हे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे खास आकर्षण आहे. बंजारा समाजाचा होळी हा उत्सव गुडीपाडव्यापर्यंत चालतो. होळीच्या काळात फेर धरून गायली जाणारी लोकगीते आणि या उत्सवातील महिलांचे स्थान अग्रणी दिसते. बंजारा पाड्यावरील बंजारा महिलांनी पारंपारिक पोशाख परिधान करून डफलीच्या तालावर बंजारा नृत्य करीत धुळवड साजरी केली आहे. यावेळी वृद्ध महिलाही मोठ्या उत्साहात सहभागी झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात बंजारा समाजात एक महिना होळीचा सण साजरा केला जातो. त्यातच होळीचा दुसरा दिवस महत्वाचा असून, दरवर्षी रंगपंचमी हा सण खास साजरा करण्यात येतो. यंदाही मोठ्या उत्साहात गावोगावी संस्कृतीप्रमाणे रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे.