पंढरीची वारी एक दिवस पोलीस ठाणे मुक्कामी...चाळीस वर्षांची परंपरा
'जाता पंढरीसी, सुख वाटे जिवा.. आनंदे केशवा, भेटतासी'...पंढरीच्या वाटेवर असलेला प्रत्येक वारकरी सध्या विठू माऊलीच्या भेटीसाठी आसुसला आहे. पण, सर्वांनाच या वारीचा अनुभव इच्छा असूनही घेता येत नाही. म्हणूनच पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांची सेवा करून त्यांच्या रूपातच विठ्ठलाला पाहण्याचा आनंद अनेकजण घेतात. हाच आनंद खाकी वर्दीतल्या विठ्ठलभक्तांनी घेतला आहे. मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द येथील श्रीक्षेत्र सिद्धेश्वर येथून येणाऱ्या पाई दिंडी सोहळ्याचा एक मुक्काम चक्क पोलीस ठाण्यात असतो. ही परंपरा गेली चाळीस वर्षांपासून अविरत सुरु आहे. वैकुंठवासी पुरुषोत्तम महाराज यांच्या दिंडीचा नववा मुक्काम अहमदनगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात असतो. यासंदर्भातला 'ई टीव्ही' भारतचा स्पेशल रिपोर्ट...