अखेर देवाचं दार उघडलं! मुंबईत मंदिरात बनवले कोविड सेंटर
मुंबई - कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्रात 15 दिवसांची संचारबंदी आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णालये खचाखच भरली आहेत. नविन रूग्णांना रूग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी एका बेडवर दोन रूग्ण अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील कांदिवली येथील पावनधाम मंदिरात कोविड सेंटर उभे करण्यात आले आहे. सध्या येथे 100 बेडची आणि ऑक्सिजनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या मंदिरातील रूग्णालयात 24 तास डॉक्टरांचे एक पथक उपलब्ध आहे.