जबरदस्त..! वयाच्या ५४व्या वर्षी 'स्टार' फुटबॉलपटू उतरणार मैदानात!
जपानच्या काझ्युओशी मिउराने आपला फुटबॉल क्लब योकोहामा एफसीबरोबर करार वाढविण्याचे मान्य केले आहे. किंग काझू म्हणून ओळख असलेला मिउरा वयाच्या ५४व्या वर्षी व्यावसायिक फुटबॉल खेळेल. येत्या २६ फेब्रुवारीला मिउरा ५४ वर्षांचा होईल. जपानचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू मिउरा आपल्या ३६व्या व्यावसायिक हंगामात भाग घेणार आहे. १९८६मध्ये ब्राझीलमध्ये सांतोस फुटबॉल क्लबकडून मिउराने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आपले वय ६० होईपर्यंत खेळणार असल्याचे मिउराने म्हटले होते.
Last Updated : Jan 12, 2021, 8:15 PM IST