Nagpur Crime: नवऱ्याच्या उपचारासाठी नागपुरात आलेल्या महिलेच्या बॅग मधून चोरट्यांनी लांबवले उपचाराचे पैसे
Nagpur Crime नागपूर: नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल, Nagpur Crime नवऱ्याच्या उपचारासाठी दाखल आणलेले पैसे महिलेच्या बॅग मधून चोरट्यांने लंपास केल्याची घटना नागपूर शहरातील मुख्य बस स्थानकावर घडली आहे. चोरट्यांने तब्बल सव्वादोन लाख रुपये लंपास केल्यामुळे आजारी नवऱ्यावर उपचार कसे करायचे, हा मोठा प्रश्न महिलेच्या समोर उभा झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील एक महिला पतीच्या उपचारासाठी नागपुरात आली असता तिच्या जवळची सव्वादोन लाख रुपयाची बॅग चोरट्यांनी उडवली. अर्चना शेडामे असे पीडित महिलेचे नाव आहे. ते पती उपचारासाठी नागपूरच्या एम्स हॉस्पिटल AIIMS Hospital येथे आल्या होते. गणेशपेठ बस स्थानकावर ई रिक्षाने पोहोचल्या तेथून ट्रॅव्हल्स बसमध्ये बसून तिकीट काढत असताना त्याच्या बॅग मधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा दोन लाख 29 हजारांचा मुद्देमाल चोरट्यानी लांबविला आहे. अर्चना शेडमे यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल Ganesh Peth Police केला असून पुढील तपास गणेशपेठ पोलीस करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST