Rohit Pawar : रोहित पवार यांनी शंभू महादेवाला घातलं साकडं, तर शंभर मुलांनी काढलं रोहित पवारांचे चित्र, पाहा व्हिडिओ
Published : Oct 25, 2023, 4:51 PM IST
पुणेRohit Pawar: युवा वर्गाच्या विविध प्रश्नांसाठी कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा (Yuva Sangharsh Yatra) सुरू केली आहे. यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर येथून करण्यात आली. आज पहाटे साडेपाच वाजता संगमेश्वराच्या महादेवाला अभिषेक करण्यात आला. यावेळी शंभू महादेवाला रोहित पवार यांनी साकडं घालून यात्रेला सुरुवात केली. यावेळी आमदार अशोक पवार, रोहित पाटील, देवदत्त निकम यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
मुलांनी काढलं रोहित पवार यांचं चित्र : युवा संघर्ष यात्रा तुळापूर मार्गे फुलगाव वरून वढू बंधाऱ्यावरून पुढे आली. दरम्यान पदयात्रेच्या मार्गावरील सैनिक शाळेतील शंभर मुलांनी रोहित पवार यांचं चित्र काढून रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला पाठिंबा दिला. या मुलांनी काढलेल्या चित्राने रोहित पवारही भारावले. दरम्यान युवा संघर्ष यात्रेचा हा शिरूर हवेली तालुक्यातील पहिला प्रवासाचा टप्पा आहे. आज यात्रेचा पहिला दिवस होता. दररोज 17 ते 22 किलोमीटर अंतर ही पदयात्रा चालणार आहे. 45 दिवस ही पदयात्रा असून, ही यात्रा नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पोहोचणार आहे.