महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची मुलांसोबत धावण्याची शर्यत, कोण जिंकले?; पाहा व्हिडिओ

By

Published : Oct 30, 2022, 5:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

तेलंगणा - गेल्या ५० दिवसांपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. यातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Bharat Jodo Yatra) आज रविवार (दि. 30 ऑक्टोबर)रोजी यात्रा सुरू असताना राहुल गांधी यांनी काही लहान मुलांसोबत धावण्याची शर्यत लावली. त्यामध्ये राहुल अगदी वेगात धावताना दिसत आहेत. (Rahul Gandhi ran a race with children) त्यांच्यासोबत तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी हेही धावताना दिसत आहेत. दरम्यान, राहुल यांच्या या धावण्याचे देशभरात कौतूक होत आहे. वय पंन्नास पार असताना त्यांची उर्जा किती अफाट आहे अशी सर्वत्र चर्चा आहे. हा व्हिडिओ सर्वत्रच व्हायरल होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details