महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Pune Fire News: येवलेवाडीत गोडाऊनमधे लागली भीषण आग; फॅब्रिक मटेरियलने घेतला पेट - materials got burnt in fire

🎬 Watch Now: Feature Video

येवलेवाडीत गोडाऊनला आग लागल्याची घटना

By

Published : Jul 14, 2023, 12:32 PM IST

पुणे : पुण्यातील कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी येथे गोडाऊनमधे भीषण आग लागल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच पुणे व पीएमआरडीए अग्निशामक दलाकडून एकुण १२ अग्निशामक वाहने घटनास्थळी रवाना झाली. आग विझवण्याचे काम सुरू आहे. जवळपास 2 ते 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली आहे. सुदैवाने या आगीत कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात गोडाऊनमधील साहित्य हे जळुन खाक झाले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून यात आद्याप कोणतीही हानी झालेली नाही. कोंढवा पोलीस स्टेशन अंतर्गत येवलेवाडी गाव येथे येवलेवाडी कमानीजवळ दीपचंद धर्मचंद शहा या फॅब्रिक कंपनीचे गोडाऊन आहे. येथेच आज सकाळी आग लागल्यामुळे गोडाऊनमधील फॅब्रिक मटेरियलने पेट घेतला. त्यामुळे परिसरात आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात उठले होते. 

ABOUT THE AUTHOR

...view details