महाराष्ट्र

maharashtra

शिर्डीत श्रीरामनवमी उत्सवाची जय्यत तयारी

ETV Bharat / videos

Ram Navami 2023: पहा, साईबाबांच्या शिर्डीत श्रीरामनवमी उत्सवाची जय्यत तयारी

By

Published : Mar 26, 2023, 10:22 AM IST

अहमदनगर :श्रीरामनवमी उत्सवदरवर्षी मोठया उत्‍साही वातावरणात शिर्डीमध्ये साजरा केला जातो. शिर्डीत हा उत्सव तीन दिवस चालतो. श्रीरामनवमी उत्सवाची साई संस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. साईबाबा संस्‍थानच्या वतीने बुधवार दिनांक २९ मार्च ते शुक्रवार दिनांक ३१ मार्च २०२३ अखेर साजरा करण्‍यात येणाऱ्या श्रीरामनवमी उत्‍सवाची तयारी पुर्ण झाली आहे. श्रीरामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले असल्याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. साईबाबांच्या अनुमतीने शिर्डीत श्रीरामनवमी उत्‍सवाची सुरुवात १९११ मध्‍ये करण्‍यात आली होती. तेव्‍हापासून दरवर्षी हा उत्‍सव मोठया उत्‍साही वातावरणात शिर्डीमध्ये साजरा केला जातो. उत्‍सवात होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेतली गेली. त्या पार्श्वभूमीवर दर्शनाची व्‍यवस्‍था सुखकर व्‍हावी, तसेच भाविकांची उन्‍हापासुन संरक्षणाकरीता मंदिर परिसरात, मंगल कार्यालय व साईनगर मैदान आदी ठिकाणी सुमारे ११ हजार चौरस फुट मंडप उभारण्‍यात आलेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details