Satara Accident : सिग्नलवर एसटीने दुचाकीला उडवले; बालरोग तज्ज्ञाचा मृत्यू, पाहा CCTV
सातारा : वाहतूक नियमन आणि कोंडी टाळण्यासाठी अनेक शहरांमधील मुख्य रस्ते तसेच गर्दीच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. तरीही वाहनधारक सिग्नल तोडून वाहने पुढे घेऊन जातात. परंतु, सिग्नलवर अति घाई करून सिग्नल तोडणे धोकादायक तसेच जीवावर कसे बेतू शकते, हे कराड शहरातील एका घटनेने दाखवून दिले आहे. कराडमधील प्रसिध्द बालरोग तज्ज्ञ चंद्रशेखर औंधकर हे आपल्या दुचाकीवरून भेदा चौकातून बसस्थानकाकडे जात होते. घाईत असल्याने सिग्नल लागल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यांनी आपली दुचाकी तशीच पुढे आणली आणि भरधाव एसटीने त्यांना उडवले. ही घटना चौकातील सीसीटीव्हीत कैद झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या डॉ. औंधकर यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाबद्दल वैद्यकीय क्षेत्राात हळहळ व्यक्त होत आहेच, परंतु अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले आहे. या घटनेचा संदर्भ देऊन अति घाईतही कोणी सिग्नल तोडू नये, असे आवाहन देखील सोशल मीडियावर केले जात आहे.