Janmashtami 2022 अशा पद्धतीने घरी साजरा करावा कृष्ण जन्मोत्सव - कृष्ण जन्मोत्सव
गोकुळ अष्टमी Gokul Ashtami, श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच दशावतारांपैकी श्रीकृष्ण अवतार यांचा जन्मोत्सव, Janmashtami 2022 आज भाविकांनी कठोरव्रत करावे, उपवास करावा आणि मध्यरात्री श्रीकृष्णाचे बाळकृष्णाची मूर्ती स्थापना करून सहपरिवार संकल्प करावा आणि षोडोपचार पद्धतीने श्रीकृष्णाची पूजा अर्चना करावी, धूप, दीप, नैवेद्य आदी श्रीकृष्णाला अर्पण करावे, विशेष करून लोणी आणि साखर हे श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे, त्याचा नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर मंगलवाद्य श्रीकृष्णाचा जयघोष, विष्णू सूक्त, पुरुष सूक्त, विष्णू महापुराण आदींचे स्तवन आणि श्रवण करावे, आनंद साजरा करावा. त्याचबरोबर सूर्य, सोम, यम,ब्रह्म, दिगपाल, भूत, भूमी आदींचे आवाहन करावे. पुर्वेकडे किंवा उत्तरे कडे तोंड करून विधिवत पूजा संपन्न करावी, याप्रमाणे श्रीकृष्ण जन्म सोहळा Shrikrishna birth ceremony मोठ्या आनंदाने सर्व भाविकांनी साजरा करावा असं महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST