महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Navratri 2022 : जगदंबा मातेचा यात्रा उत्सव; राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल

By

Published : Sep 26, 2022, 4:45 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

येवल्याचे ग्रामदैवत कोटमगाव येथील जगदंबा मातेचा यात्रा उत्सव होत ( Jagadamba Mata Yatra Utsava ) आहे. यावेळी रमेशगिरी महाराजांच्या हस्ते घटस्थापना संपन्न झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. येवला तालुक्यातील कोटमगाव येथील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती असे त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेच्या मंदिरात नवरात्री ( Navratri 2022 )उत्सवानिमित्त मंदिरापुढे रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. घट बसणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्थादेखील करण्यात आली ( Ghatasthapana through rameshgiri Maharaj )आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या जगदंबा मातेच्या दर्शनाकरता औरंगाबाद, नगर, धुळे, नाशिकसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भावी नवरात्र काळात दर्शनासाठी येत असतात. घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेलाच सकाळपासूनच जगदंबा मातेच्या दर्शनाकरता भाविकांची गर्दी बघायला ( Jagadamba Mata Yatra festival in Nashik ) मिळाली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details