महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO दारूगोळा-बंदूकांची होळी पाहिलीये का कधी? पाहा राजस्थानमधील होळीचा हा व्हिडीओ - दारूगोळा आणि बंदूकांनी होळी

🎬 Watch Now: Feature Video

राजस्थानमधील होळी

By

Published : Mar 9, 2023, 11:04 AM IST

उदयपूर ( राजस्थान ) :दक्षिण राजस्थानमध्ये असलेल्या उदयपूर जिल्ह्यातील एका गावात रंगांनी नव्हे तर दारूगोळा आणि बंदूकांनी होळी खेळली जाते. जवळपास 500 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा बुधवारी शाही थाटात खेळली गेली. उदयपूरपासून 40 किमी अंतरावर असलेल्या मेनार गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी जमराबीजमध्ये भव्य आतषबाजी आणि हवाई फायरिंग पाहायला मिळाली. यावेळी चौफेर गोळीबाराचा आवाज ऐकू येत होता. आवाज ऐकून असे वाटत होते की आपण होळी नाही तर दिवाळी साजरी करत आहोत. या होळीला ऐतिहासिक महत्त्व आहे. या गावातील लोकांनी मुघलांचा पराभव करण्यासाठी मुघलांना भरपूर त्रास दिला होता. त्यांना परिसर सोडून जाण्यासाठी भाग पाडले होते. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा सुरू आहे. आजही राजस्थानमधील गावांमध्ये दारूगोळ्यांची होळी खेळताना पहायला मिळते. 

ABOUT THE AUTHOR

...view details