PFI Ban: पीएफआयवर बंदी घालण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाय हवा; पाहा दवे यांची सविस्तर प्रतिक्रिया
पुणे - मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि इतर काही संघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआय संघटनेवर दहशतवादी आणि देशविरोधी कारवाया केल्याचा तपास यंत्रणांनी ठपका ठेवला आहे. पीएफआयच्या कारवाया लक्षात घेऊन तपास यंत्रणांनी संघटनेवर बंदी घालण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाला केली होती. त्यानंतर गृहमंत्रालयाने अध्यादेश काढत बंदी घातली आहे. यावर हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांची आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी सविस्तर प्रतिक्रिया जाणून घेतली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST