महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Donkey Race Video : आंध्र प्रदेशातील रथोत्सवात गाढवांची शर्यत

By

Published : Apr 23, 2022, 10:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

अनंतपूर ( आंध्र प्रदेश ) - आंध्र प्रदेशात सृजनार्दन व्यंकटेश्वर स्वामी रठोडोत्सवाचे ( Sri Janardhana Venkateswara Swamy Rathodsavam ) आयोजन (Chariot Festival ) करण्यात आले होते. यावेळी गाढवाची शर्यत स्पर्धाही ( Donkey Race in Anantapur ) घेण्यात आली. या शर्यतीत गाढवांचे मालक त्यांच्यावर बसतात. त्यांना शर्यत पूर्ण करण्यासाठी गाढवांना धावायला ( donkey running competition ) लावतात. ही शर्यत पाहण्यासाठी जिल्ह्यातील आजूबाजूच्या भागातून लोक मोठ्या संख्येने आले होते. ही स्पर्धा मैदानावर नव्हे तर रस्त्यावर घेण्यात आली. एकूण 18 किलोमीटर अंतरासाठी गाढव धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वज्रकरूर ते नऊ किलोमीटरचे अंतर केवळ तीन गाढवांनी पूर्ण केले. ही गाढवाची शर्यत अतिशय मनोरंजक आणि स्पर्धात्मक होती. ही शर्यत तरुणांनी दुचाकीवरून पाहिली. दरवर्षी या शर्यतीचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्पर्धांचे आयोजन करता आले नाही. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक व शाल देऊन गौरविण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details