Kirit Somaiya on Anil Parab अनिल परबांचं कथित साई रिसॉर्ट पाडण्याची प्रक्रिया सुरु
Kirit Somaiya on Anil Parab रत्नागिरी भाजपा नेते किरीट सोमैयां यांनी दापोलीत आल्यानंतर प्रांत कार्यालयात पोलीस, प्रांत अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी साई रिसॉर्ट तोडकामाबाबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, उद्धव ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक म्हणजेच अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी दोन दिवसांत कन्सल्टंट नेमला जाईल आणि आठवडाभरात तो आपला प्लान तयार करून देईल. त्यानंतर नवरात्री दरम्यान पुन्हा एकदा निविदा काढली जाईल. आणि दसऱ्याच्या दिवशी आसुरी शक्तीवर विजय प्राप्त करण्यासाठी रिसॉर्ट तोडण्याचं काम सुरू होईल, असा विश्वास आपल्याला असल्याचे किरीट सोमैयां यांनी यावेळी म्हणाले आहेत. तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा झाली, त्यांनी ताबडतोब अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला पाहिजे, त्यासाठी अधिकची माहिती मी त्यांना दिली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की अनिल परब यांनी कन्स्ट्रक्शन मीटर स्वतःच्या नावाने 2020 मध्ये घेतलं होतं. म्हणजेच कोविड काळात रिसॉर्टचं काम केलं. त्यामुळे रिसॉर्ट तुटणार आणि अनिल परब यांच्यावर 100 टक्के फौजदारी दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होणार असं किरीट सोमैयां यांनी यावेळी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST