Video सूर्यग्रहण पाहण्यासाठी रमण विज्ञान केंद्रात खगोलप्रेमींनी केली गर्दी
नागपूर या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण पाहण्यासाठी नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रात Raman Science Centre खगोल प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. ग्रहण पाहण्याची उत्सुकता अनेकांना रमण विज्ञान केंद्रापर्यंत घेऊन आली होती. टेलिस्कोपच्या माध्यमातून नागपूरकरांना खगोलीय घटना अनुभवायला मिळाली. नागपूरकरांना ग्रहण बघता यावं, यासाठी विशेष गॉगलची पण व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी 11 वाजून 28 मिनिटापासून सूर्यग्रहणाला सुरूवात झाली, तर संध्याकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्ण झालं. मात्र, प्रत्यक्षात 4 वाजून 22 मिनिटापासून दिसायला सुरुवात झाली आणि 5 वाजून 26 मिनिटांपर्यंत ग्रहण पूर्ण झाले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST