Mango Seeds : गावरान आंब्याच्या बिया जमा करून 7 हजार रोपे तयार; मागील दहा वर्षांपासून जोपासला छंद
बुलढाणा - येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील एका ध्येयवेड्या अधिकाऱ्याने गावरान आंब्याच्या झाडाखालील किंवा घरातील आंबे खाल्यानंतर त्या बीया जमा करून त्यापासून गावरान आंब्याची रोपे तयार करण्याचा छंद मागील दहा वर्षांपासून जोपासला आहे. हा संपूर्ण खर्च ते स्वतःच्या खिशातून करतात. तर काही त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा याला हातभार लावला असल्याचे हा ध्येयवेड्या अधिकारी सांगतो.
बुलढाणाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपकार्यकारी अभियंता असलेले व्ही पी देशमुख हे मागील दहा वर्षांपासून नामशेष होत चाललेल्या गावरान आंब्याची रोपे तयार करून ते शाळा, ग्रामपंचायत, मंदिर परिसर किंवा रस्त्यावर ज्या ठिकाणी जागा असेल त्या ठिकाणी ती रोपे लावण्यासाठी देतात. तसा एक फलक उप कार्यकारी अभियंता देशमुख यांनी त्यांच्या कार्यालयात लावला असून, तो या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो.