महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : शिवसेनेचे नेते गोव्यात येऊन फक्त डरकाळ्या फोडतात; डॉ. प्रमोद सावंत शिर्डीत

By

Published : Feb 26, 2022, 12:30 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

अहमदनगर - महाराष्ट्रात शिवसेना भाजपाबरोबर असायची. मात्र गोव्यात आमच्या कायम विरोधात असायची. त्यामुळे गोवा निवडणुकीत शिवसेनाचा कुठलाही परिणाम पडणार नाही. शिवसेनेचे मोठे नेते गोव्यात येऊन फक्त डरकाळ्या फोडत असतात. मात्र त्यांचा प्रभाव जमिनीवर दिसत नसल्याची टिका गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सकाळी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. यावेळी सावंत यांनी साईबाबांची पुजा करत साईबाबांचे दर्शन घेतले आहे. देशावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दुर होवे, गोव्यात पुन्हा भाजपाचे सरकार यावे यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिर्डी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली. त्याचबरोबर चार राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार असून पंजाब मध्ये मोठ्या प्रमाणात जागा आम्ही जिंकणार असल्याचा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details