महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Dhule Fire Video : धुळे शहरातील शंकर मार्केट कापड मार्केटला भीषण आग; 35 ते 40 दुकाने जळून खाक

By

Published : Mar 22, 2022, 5:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

धुळे - शहरातील पाच कंदील भागात असलेल्या शंकर मार्केट नावाच्या कापड मार्केटला भीषण आग लागली. ( Fire in Dhule Shankar Market ) शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. एका दुकानाला लागलेल्या आगीमुळे यात जवळपास 35 ते 40 दुकाने भस्मसात झाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. घटनेची माहिती मिळताच महापौर प्रदीप कर्पे स्थायी समिती सभापती शितल नवले हे देखील घटनास्थळी दाखल झाले. कापड मार्केटला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. या घटना रोखण्यासाठी भविष्यात योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन महापौर प्रदीप कर्पे ( Dhule Mayor Pradip Karpe on Shankar Market Fire ) यांनी दिले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details