७५० रुपये किलो दराचे मटण खाण्यापेक्षा जिममध्ये व्यायाम करा- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा सल्ला
ठाणे - बकऱ्यांच्या मटणाचे भाव 750 किलोवर पोहोचला आहे. त्यातच आपण एक किलो मटण एकाच वेळ खाऊन फस्त करतो. त्यापेक्षा त्या पैशात थोडीभर टाकून एक महिना जिम लावल्यास आपले शरीर सुदृढ बानू शकते, असा सल्ला केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी तरुणांना दिला. ते भिवंडी तालुक्यातील एका जिमच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. प्रो फायटर जिमचे उद्घाटन झाल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी ही शोल्डर मशीनवर कसरत करीत उपस्थितांची मने जिंकली.
Last Updated : Nov 6, 2021, 6:17 PM IST