bjp leader anil bonde अमरावती हिंसाचाराची न्यायाधीशामार्फत उच्चस्तरीय चौकशी करा; अनिल बोडेंची राज्यपालांना मागणी
अमरावती - अमरावतीमध्ये १२ तारखेला निघालेल्या मोर्चातून आणि त्यातून झालेल्या हिंसाचाराची (anil bonde demand governor inquiry) उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते डॉ. अनिल बोंडे (bjp leader anil bonde) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे आज निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. राज्यात बारा तारखेला नांदेड, मालेगाव, अमरावती येथे झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. या दंगलीमागे कोणाचा हात आहे? हे या सरकारच्या चौकशीच्या माध्यमातून समोर येणार नाही. कारण हे सरकार लपवा छपवीचे सरकार आहे, असा आरोपही डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. त्यामुळेच, या हिंसाचार प्रकरणाची (inquiry into Amravati violence) चौकशी ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत करावी, अशी मागणी राज्यपाल यांच्याकडे डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. तसेच, शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई, वीज तोडणी बंद करावी, अशी मागणीही बोंडे यांनी केली आहे.