महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स

By

Published : Jul 10, 2021, 12:19 PM IST

जेथे रंग-बेरंगी फुलांचा बगीचा आहे. ज्याठिकाणी फुलांचा सुगंध दरवळत आहे. अशा निसर्गरम्य ठिकाणची सहल करायला कोणाला जायला आवडणार नाही. आम्ही अशा दरी खोऱ्याबद्दल बोलतोय जे फुलांसाठी जगात प्रसिद्ध आहे. उत्तराखंडमधील पश्चिम हिमालय पर्वत रांगेत ही फुलांची दरी आहे. येथे देश-विदेशातून लाखो पर्यटक मनमोहक फुले पाहायला येतात. सर्वांना ही फुले भुरळ घालतात. याठिकाणी फुलांच्या अनेक जातींची माहिती मिळते. रंगी-बेरंगी फुलांच्या जाती पर्यटकांना भुरळ घालतात. निसर्गप्रेमींसाठी ही जागा स्वर्गापेक्षा काही कमी नाही. स्थानिक लोक या फुलांच्या दरीला फुलपाखरांचा निवारा मानतात. त्यामुळं त्याठिकाणी जाणं लोकं टाळतात. 1931 मध्ये फ्रैंक स्मिथ आणि होल्डस्वर्थ या ब्रिटीश गिर्यारोहकांनी या फुलांच्या दरीचा शोध लावला. त्यामुळं ही दरी जगप्रसिद्ध झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details