डिजिटल अंतर कमी करुन शेवटच्या घटकापर्यंत इंटरनेट सेवा उपलब्ध करू - डॉ. निशांक पोखरियाल
नवी दिल्ली - कोरोनाच्या या महासंकटात शाळा, महाविद्यालये अजूनही बंद आहेत. यामुळे देशात ऑनलाईन शिक्षणाचे आव्हान स्विकारले आहे. मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आले. ऑनलाईन वर्ग राबवताना सुरुवातीला चुका होत्या. मात्र, शाळा व महाविद्यालये या कार्यक्रमात यशस्वी ठरल्या आहेत. तसेच डिजिटल अंतर कमी करुन शेवटच्या घटकापर्यंत इंटरनेट सेवा उपलब्ध करू, असा विश्वास मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. निशांक पोखरियाल यांनी व्यक्त केला आहे. 'ईटीव्ही भारत'ने त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.