ग्रेस कुटुंबाची भूतदया; करत आहे कुकू नावाच्या दिव्यांग कावळ्याची सेवा
मुंबई - आपल्या अनेक संत-महात्म्यांनी भूतदयेची शिकवण दिली आहे. मुंबईतील ग्रेस कुटुंब या शिकवणीचे पालन करत आहे. गेल्या काही वर्षांपासून ते एका दिव्यांग कावळ्याचे पालन-पोषण करत आहेत. त्यांनी त्याचे नाव कुकू ठेवले आहे. तो ग्रेस कुटुंबाचा एक सदस्य झाला आहे. ग्रेस कुटुंबाची माया आणि प्रेम पाहून कुकू नावाचा हा कावळा या कुटुंबाला सोडून जाण्यास तयार नाही. या कुटुंबाला देखील कुकूचा लळा लागला आहे.