हैदराबादमध्ये मफिद हेल्पिंग सेंटरचा स्तुत्य उपक्रम; गरजूंसाठी दररोज मोफत जेवणाची सोय
लॉकडाऊनच्या काळात हैदराबादमध्ये विविध ठिकाणी गरजूंना मदत पुरवण्यात आली. काहींनी जेवण तर काहींनी निवारा देऊन गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला. यामध्ये मफिद हेल्पिंग सेंटरने पुढाकार घेऊन संचारबंदीच्या काळात अडकलेल्यांना दोन वेळचे जेवण मोफत पुरवले आहे. फिजिकल डिस्टन्सचे पालन करून ते अन्नाचे वाटप करतात. त्यांचा या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.