केरळ : सुलेमान यांचं बोन्सायचं झाडांचं साम्राज्य
केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील कुप्पम तलिपारम्बामधील हे घर लहान झाडांनी भरलेल्या स्वर्गासारखं दिसतं. हे सुलेमान यांचं घर आहे. सुलेमान यांच्याकडं अनेक जातींच्या झाडांच्या बोन्सायचा मोठा संग्रह आहे. ज्यामध्ये पूर्ण उमलणाऱ्या फुलझाडांचाही समावेश आहे. शिवाय, लहान-लहान फळझाडं, चिंच, वड आणि इतर अनेक प्रकारची फळझाडंही उपलब्ध आहेत. या सर्व झाडांची लहान कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. सुलेमान यांच्या संग्रहात 400 हून अधिक बोन्साय झाडं आहेत.