कोरोनाकाळात घेतलेल्या योग्य निर्णयामुळे देशवासियांचे प्राण वाचले - राष्ट्रपती
नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज आपल्या अभिभाषणात अनेक मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सरकारने कोरोनाळाकाळात घेतलेल्या निर्णयाचे कौतूक केले. सरकारने कोरोना काळात मजूरांना घरी जाण्यासाठी रेल्वे सुरू केल्या. तसेच गरिबांना धान्य पुरवलं, असे राष्ट्रपती म्हणाले. तसेच कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तसेच भारत सर्वांत मोठे लसीकरण अभियान राबवत असल्याचे ते अभिभाषणात म्हणाले.