उदयगिरीची प्रसिद्ध काष्टकला जी पोहोचलीये सातासमुद्रापार...
उदयगिरी (आंध्र प्रदेश) : लाकडी खेळणी म्हटलं की डोळ्यासमोर कोंडापल्लीचे नाव येते. मात्र, लाकडी खेळण्यांसोबतच इतर उपयोगी घरगुती वस्तूंची निर्मीती करत उदयगिरीने लाकडी कलाकृतींच्या व्यवसायात आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. येथील दिलावर भाई मार्ग येथे तयार करण्यात येणाऱ्या लाकडी कलाकृतींना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. उदयगिरीच्या जंगलातील नर्दी, कालिवी, बिक्की आणि देवधारी या लाकडांपासून विविध आणि उत्तम वस्तूंची निर्मीती केली जाते. या कलाकृतींमध्ये प्लेट्स, हेअर क्लिप, खेळणी, चमचे, काटेरी चमचे आणि ट्रेपर्यंतच्या सगळ्या वस्तू तयार केल्या जातात. तसेच, अगदी वाजवी किंमतीत या वस्तू आपल्याला बाजारात उपलब्ध होतात.