महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

तुम्ही शाकाहारी आहात का? मग हा तुमचाच दिवस आहे

शाकाहारी पदार्थ खूप परिपूर्ण आणि वैविध्यपूर्ण आहेत. तुम्हाला निवडता येतील असे हजारो शाकाहारी पदार्थ आहेत. सध्या शाकाहारी होण्याचाही एक ट्रेंड होत आहे. जागतिक शाकाहारी दिनानिमित्त हा विशेष लेख

World Vegetarian Day
जागतिक शाकाहारी दिन

By

Published : Oct 2, 2020, 7:48 PM IST

हैदराबाद -प्राण्यांना क्रूरतेने मारून त्यांचे सेवन करण्याचे टाळण्यासाठी शाकाहारी होणे हा ट्रेंड हळूहळू रुढ होत आहे. म्हणूनच दर वर्षी १ ऑक्टोबर हा जागतिक शाकाहारी दिन म्हणून साजरा होतो. शाकाहाराचा प्रसार करणे आणि शाकाहार आरोग्य आणि पर्यावरणासाठी कसा उपयोगी आहे, याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस आहे. शाकाहार हा वनस्पतींपासून मिळतो. हा दिवस पहिल्यांदा 'नॉर्थ अमेरिकन व्हेजिटेरियन सोसायटीने'(एनएव्हीएस) १९७७मध्ये साजरा केला होता.

शाकाहारी लोकांचे प्रकार -

राष्ट्रीय आरोग्य पोर्टल (एनएचपी) मध्ये शाकाहारी लोकांचे ३ प्रकार दिले आहेत.

१) वेगन - या व्यक्ती आहारात फक्त वनस्पतीपासून मिळणारे अन्न सेवन करतात. यात प्राण्यांपासून मिळणारे कुठलेच प्रोटिन खाल्ले जात नाही. म्हणजे अंडी, दूध किंवा मध यांचे सेवन होत नाही. या प्रकारच्या आहारात कच्ची फळे, भाज्या, शेंगा, कोंब आलेले धान्य आणि शेंगदाणे यांचा समावेश असतो.

२) लॅक्टो शाकाहार - यात वनस्पतीपासून मिळणारे अन्न आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो मात्र, अंडी नसतात.

३) लॅक्टो ओव्हो शाकाहार - यात वनस्पतीपासून मिळणारे अन्न, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यांचा समावेश असतो.

संतुलित आहार घेणे -

तुम्ही कुठल्याही प्रकारचा शाकाहार स्विकारलात तरीही शरीराच्या कार्यासाठी आणि वाढीसाठी पुरेसा पोषक आहार मिळेल याची खात्री असायला हवी. त्यासाठी संतुलित आरोग्यपूर्ण आहाराची गरज आहे. राष्ट्रीय आरोग्य पोर्टलमध्ये खालील पदार्थ आणि त्यात आढळणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची माहिती दिलेली आहे.

व्हिटॅमिन बी १२ - दुग्धजन्य पदार्थ, अंडी, व्हिटॅमिन्सयुक्त धान्य, ब्रेड, सोया आणि तांदळाची पेज.

व्हिटॅमिन डी - दूध आणि सूर्यप्रकाश.

कॅल्शियम - दुग्धजन्य पदार्थ, गडद हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली.

प्रोटीन - डाळी, दुग्धजन्य पदार्थ (दूध आणि चीज), अंडी, टोफू, इतर सोया उत्पादने, सुके सोयबीन, काजू, शेंगदाणे, बदाम.

लोह - अंडी, सुके बिन्स, सुका मेवा, संपूर्ण धान्य, हिरव्या पालेभाज्या.

झिंक - गव्हांकुर, दाणे, अन्नधान्ये, सुके बिन्स आणि भोपळ्याच्या बिया.

शाकाहार स्वीकारण्याचे फायदे -

शाकाहारी असण्याचे काही फायदे आहेत. राष्ट्रीय आरोग्य पोर्टल (एनएचपी)ने सांगितलेले फायदे पुढीलप्रमाणे -

  • हृदय रोग आणि कर्करोगाचा धोका खूप कमी होतो.
  • शाकाहार चयापचय क्रिया वाढवते आणि शरीराचे वजन कमी करण्यात मदत करते.
  • शाकाहारी आहारात संपूर्ण धान्य, शेंगदाणे, फळे आणि भाज्या असतात, जे फायबर, अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे तसेच आवश्यक खनिजे पुरवतात.
  • मांस न खाल्ल्याने तुमची चरबी वाढत नाही.
  • मासांहारी आहाराच्या तुलनेत शाकाहारी अन्नात कोलेस्टेरॉलची पातळी खूपच कमी असते.
  • शाकाहार प्राणी वाचवण्यासाठी मदत करतो.

‘योग्य नियोजनकरून केलेला शाकाहार सर्व वयोगटातील व्यक्ती, मुले, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक यांच्या पोषणाच्या गरजा पूर्ण करतो. तुम्ही तुमच्या पोषक आहाराबद्दल जागरुक असाल तर त्याप्रमाणे तुमच्या आहाराचे नियोजन करू शकता.’

शाकाहारी होण्याच्या पायऱ्या -

  • तुम्ही तुमचे मन तयार करा आणि तुम्हाला शाकाहारी का व्हायचे आहे हे समजून घ्या.
  • मांस, मासे खाण्याच्या तुमच्या इच्छेवर नियंत्रण ठेवा.
  • तुम्ही खात असलेले पदार्थ बदला. त्या जागी टोफू किंवा सोया निवडा.
  • पदार्थात काय घटक आहेत हे पाहण्यासाठी त्यावरचे लेबल वाचा.
  • ऑनलाइन असणाऱ्या रुचकर, चविष्ट शाकाहारी भरपूर रेसिपी पाहा.
  • तुमच्या शाकाहारी मित्र-मैत्रिणींना शाकाहारी पदार्थांचे चांगले पर्याय विचारा. त्यांच्यासोबत बाहेर जाऊन तोंडाला पाणी सुटेल अशा पदार्थांची चव घ्या.

ABOUT THE AUTHOR

...view details