हैदराबाद : कढीपत्ता चहा कसा बनवायचा (Method of making curry leaf tea) -कढीपत्त्याचा चहा बनवण्यासाठी सुमारे 15-20 ताजी कढीपत्ता पाने घ्या. त्यांना पाण्याने स्वच्छ करा. चहाच्या भांड्यात एक कप पाणी घाला आणि गॅसवर ठेवा. पाणी उकळायला लागल्यावर गॅस बंद करा. आता त्यात कढीपत्ता टाका. थोडावेळ असेच झाकून ठेवा. गोडवा हवाच असल्यास थोडा गुळ वापरा, साखर नको. काही मिनिटांतच पाण्याचा रंग बदलू लागेल. चहा एका कपमध्ये गाळून घ्या आणि गरमागरम पिण्याचा (curry leaves Tea is beneficial for health) आनंद घ्या.
कढीपत्त्याच्या चहाचे फायदे (curry leaves Tea) - 1. आरोग्यदायी फायदे : कढीपत्ता दक्षिण भारतात जास्त वापरला जातो. मात्र, आता बहुतांश लोकांनी त्याचा वापर सुरू केला आहे. कढीपत्त्याचा उपयोग फक्त फोडणी देण्यासाठीच केला जात नाही, तर या औषधी वनस्पतीपासून बनवलेला एक कप चहा देखील आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे देतो.
2. पचनक्रिया निरोगी राहते - कढीपत्त्याचा चहा प्यायल्याने पचनक्रिया निरोगी राहते. त्यात सौम्य रेचक गुणधर्म आणि पाचक एंजाइम असतात, जे आतड्याची हालचाल सुधारतात. यामुळे पचनक्रियाही सुधारते. बद्धकोष्ठता, गॅस, जुलाब आदी समस्याही कढीपत्त्याचा चहा प्यायल्याने कमी होतात.
3. साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रभावी :जर तुम्हाला मधुमेह असेल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर तुम्ही कढीपत्ता चहाचे सेवन करू शकता. कढीपत्ता चहा रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही, साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे.