महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Relationship Tips : पालक आणि मुलांचं नातं मजबूत करतील 'ह्या' टिप्स; जाणून घ्या...

पालक आणि मुलांचं नातं हे इतर नात्यांपेक्षा साहजिकच आगळं असतं. मजबूत नातं निर्माण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न करावे लागतात. पालकांचे त्यांच्या अपत्याशी असलेलं नातं त्यांच्या भविष्यावर परिणाम करतं. तसेच मुलांचं त्याच्या पालकांशी असलेलं नातं त्याच्या वर्तनावर परिणाम करू शकतं.

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 12:31 PM IST

Relationship Tips
पालक आणि मुलांचं नातं

हैदराबाद :मुलांसाठी सर्वात महत्त्वाचं नातं हे त्याच्या पालकांशी निर्माण केलेलं नातं असतं. एक मूल त्याच्या सभोवतालच्या जगाबद्दल त्याच्या पालकांकडून शिकतं. मुलं सुरक्षितता, प्रेम इत्यादींसाठी त्यांच्या पालकांवर अवलंबून असतात. मुलं आणि पालक यांच्यात घट्ट नातं निर्माण होणं अत्यावश्यक असतं. जर तुम्हीही पालक असाल तर मुलाशी घट्ट नातं निर्माण करण्याचा पाया अगदी सुरुवातीपासूनच घातला पाहिजे. मुलाला समजून घ्या, त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवा आणि त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करा. जाणून घेऊ या अशा काही बाबी ज्यामुळे तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट होऊ शकतं.

तुमचं प्रेम व्यक्त करा : निरोगी आणि चांगल्या नात्यासाठी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांवर प्रेम व्यक्त करणं आवश्यक आहे. तुमच्या बाळाला मिठी मारा, त्याला प्रेमाने सांभाळा म्हणजे त्याला समजेल की तुमच्या आणि त्याच्यामधलं नातं खास आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांशी बोलता, तेव्हा त्यांच्याशी जवळीक साधण्याचा आणि त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करा. त्यांना प्रेमळ वागणूक देऊन मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहित करा.

तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे सांगत राहा : प्रत्येक पालकाचं आपल्या मुलांवर अपार प्रेम असतं, हे उघड आहे. पण हे त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं नाही तर त्यांना कळणार कसं? त्यांचं वय कितीही असो. फक्त त्यांना वरचेवर सांगत राहा की, तुमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. यामुळे तुमचं आणि तुमच्या मुलाचे नाते दीर्घकाळ घट्ट राहील.

मर्यादा सेट करा आणि नियम बनवा: जसजसं मुल मोठं होतं आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाबद्दल शिकतं, त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता वाढत जाते. त्यामुळे तुमच्या मुलांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत, याबद्दल बोला. जेव्हा नियम मोडले जातात तेव्हा योग्य परिणाम होतील याची कल्पना द्या, जेणेकरून नियम मोडले जातात तेव्हा काय होऊ शकतं, हे मुलांना कळेल.

ऐका आणि मुलांप्रति सहानुभूती दाखवा :जर तुम्ही चांगले श्रोते असाल तर तुमचे सर्वांशी चांगले संबंध राहतील. मुलांच्या बाबतीतही असंच आहे. त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी त्यांचं ऐकणं आणि त्यांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांना कळू द्या की, तुम्ही त्यांच्या मदतीसाठी सदैव असाल. तुमच्या मुलाच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने तुमचं आणि तुमच्या मुलाचं नातं अधिक घट्ट होईल.

एकत्र खेळा: मुलांच्या विकासासाठी खेळ खूप महत्वाचे आहेत. खेळांमुळे त्यांच्यातली निर्णयक्षमता वाढते. ते भावना व्यक्त करण्यास शिकतात. सर्जनशीलता वाढते. तसंच विविध खेळांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलाशी तुमचे नाते सुधारू शकता.

मुलांसाठी उपलब्ध व्हा :दररोज किमान 10-15 मिनिटे तुमच्या मुलाशी बोला. या काळात लक्ष विचलित करू नका. टीव्ही बंद करा, सेलफोन बाजूला ठेवा आणि मुलांसोबत उपयुक्त वेळ व्यतित करा.

एकत्र जेवा: एकत्र खाल्ल्याने भरपूर संभाषण होऊ शकतं आणि तुम्हाला तुमच्या मुलासोबतचं तुमचं नातं मजबूत करण्याची संधी मिळते. जेवताना सेलफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं दूर ठेवा. मुलांना आरोग्य आणि सकस आहाराचं महत्त्व समजावून सांगा. त्यांच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा कसा परिणाम होतो, ते सांगा.

हेही वाचा :

  1. Jasmine Flower for Skin : सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी जाईचे फूल फायदेशीर; जाणून घ्या सौंदर्य फायदे...
  2. Yoga Tips : योगासने करण्यापूर्वी पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या काय आहेत नियम...
  3. Weight Gain Remedies : सडपातळ असल्यानं टोमणे नको, 'हे' पदार्थ खा..वाढू शकते वजन

ABOUT THE AUTHOR

...view details