हैदराबाद :Navratri 2023 नवरात्रीचा उत्सव देशभरात अनेक प्रकारे साजरा केला जातो. यावेळी पश्चिम बंगालमध्ये भव्य दुर्गापूजेचं आयोजन केलं जाते. गुजरातमध्येही नवरात्रीच्या काळात गरबा आणि दांडिया खेळण्याची प्रथा आहे. त्यामुळं नवरात्रीत लोक अनेकदा गरबा आणि दांडिया खेळतात. पण गरबा आणि दांडिया यातील फरक फार कमी लोकांना माहीत आहे. होय, गरबा आणि दांडियाची नावं ऐकून अनेकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे बहुतेक लोक या दोन नृत्य सादरीकरणांना एक समजतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गरबा आणि दांडिया एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. जाणून घ्या गरबा आणि दांडियामध्ये काय फरक आहे.
गरबा आणि दांडियाचं महत्त्व : नवरात्रीत गरबा आणि दांडिया खेळण्याला खूप महत्त्व आहे. विशेषतः गुजरातमध्ये गरबा आणि दांडिया खेळण्याची प्रथा शतकानुशतके जुनी आहे. नवरात्रीच्या सणात दुर्गा मातेच्या किंवा अखंड ज्योतीच्या मूर्तीसमोर गरबा आणि दांडिया खेळला जातो.
गरबा आणि दांडियाचा अर्थ :गरबा आणि दांडिया या दोन्हींचे अर्थ एकमेकांपेक्षा बरेच वेगळे आहेत. गरबा हा शब्द गर्भातील बाळाच्या जीवनापासून बनला आहे. गरबा दरम्यान लोक जीवनाच्या चक्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मंडळांमध्ये नृत्य करतात. तर दांडिया नृत्य हे माता दुर्गा आणि महिषासुर यांच्यातील युद्धाचं प्रतीक आहे. त्यामुळं दांडियामध्ये लोक तलवारींऐवजी रंगीबेरंगी काठ्या घेऊन नाचतात.