महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

National Eye Donation Fortnight 2023 : राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा आजपासून होतोय साजरा, जाणून घ्या महत्त्व

भारतात दरवर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. नेत्रदानासाठी लोकांना प्रवृत्त करणे आणि प्रोत्साहित करणे, नेत्र प्रत्यारोपण किंवा नेत्रदानाशी संबंधित विविध गैरसमज दूर करणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

National Eye Donation Fortnight 2023
National Eye Donation Fortnight 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 8:15 PM IST

Updated : Aug 25, 2023, 7:12 AM IST

हैदराबाद :नेत्रदानाला महादान म्हणतात कारण या दानामुळे अंधांना जग पाहण्याची संधी मिळते. परंतु सामाजिक व धार्मिक परंपरांमुळे किंवा भीती व गोंधळामुळे लोक नेत्रदान करण्यास घाबरतात. दुसरीकडे ज्यांना असे करायचे आहे, ते नेत्र प्रत्यारोपणाशी संबंधित आवश्यक माहिती नसल्याने नेत्रदान करू शकत नाहीत. नेत्रदानाविषयी जनजागृती वाढवणे, त्यासंबंधीच्या गैरसमजांची सत्यता लोकांना जागृत करणे आणि मृत्यूनंतर नेत्रदान करण्यास प्रवृत्त करणे या उद्देशाने भारतात दरवर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो.

अंध आणि नेत्र प्रत्यारोपणाशी संबंधित आकडेवारी : सन 2020 मध्ये, दृष्टीदोष तज्ञ गट आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ ब्लाइंडनेस या दोन आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांच्या सर्वेक्षणानंतर अंधत्वाशी संबंधित काही आकडेवारी जाहीर केली. ज्यामध्ये असं म्हटल होतं की, जगात सर्वाधिक अंध लोक भारतात आहेत. 2020 पर्यंत भारतात सुमारे 92 लाख लोक अंध होते. तर चीनमध्ये अंधांची संख्या 89 लाख असल्याचं सांगण्यात आलं. गेल्या 30 वर्षांत भारतातील 'निअर व्हिजन लॉस' किंवा प्रिस्बायोपियाच्या प्रकरणांमध्ये दुप्पट वाढ झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. 1990 मध्ये या समस्येची सुमारे 5.77 कोटी प्रकरणे नोंदवली गेली होती. तर 2019 मध्ये 13.76 कोटी भारतीयांमध्ये 'नजीक दृष्टी कमी झाल्याची' प्रकरणे होती.

वेळेवर उपचार न मिळाल्याने अंधत्वाचे बळी -दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात सुमारे 1.5 कोटी अंध लोक आहेत, तर 13 कोटींहून अधिक लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने अंशतः अंध आहेत. ही चिंतेची बाब आहे की यातील 80% लोक असे आहेत जे वेळेवर उपचार न मिळाल्याने डोळ्यांच्या आजाराचे किंवा अंधत्वाचे बळी झाले आहेत. उपलब्ध आकडेवारीवर विश्वास ठेवला तर यापैकी सुमारे एक तृतीयांश लोक नेत्र प्रत्यारोपणाद्वारे पाहू शकतात. विविध संबंधित संस्थांनी वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारतात नेत्र प्रत्यारोपणासाठी सुमारे अडीच लाख कॉर्नियाची गरज आहे. मात्र नेत्रदानासाठी दात्यांच्या तुटवड्यामुळे प्रत्यारोपणासाठी केवळ 50,000 कॉर्निया उपलब्ध आहेत.

इतिहास आणि मिशन : आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयोजित राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यात पंधरा दिवस शासकीय व निमसरकारी आरोग्य व सामाजिक संस्थांमार्फत विविध प्रकारचे जनजागृती व तपासणी कार्यक्रम व मोहिमा आयोजित केल्या जातात. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत चालणारा हा कार्यक्रम 1985 मध्ये भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने भारतात नेत्रदात्यांचा तुटवडा लक्षात घेऊन लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने सुरू केला होता.

असा साजरा केला जातो पंधरवडा : विशेष म्हणजे या पंधरवड्यात जनजागृती करण्याबरोबरच मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे, नेत्रदानाशी संबंधित समस्यांबाबत प्रबोधन करणे, त्यासंबंधीचे संभ्रम दूर करणे आणि नेत्ररोपणाची आवश्यकता व पद्धती याविषयी प्रबोधन करणे असे विविध उपक्रम आहेत. कार्यक्रम, मोहिमा, परिषदा आणि परिसंवाद इत्यादींचे आयोजन जनजागृती आणि इतर संबंधित माहितीबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने केल जाते.

हेही वाचा :

  1. Yoga for Bloating : तुम्हालाही पोट फुगल्यासारखे वाटते का ? या योगासनांमुळे होईल ही समस्या दूर...
  2. World Vada Pav Day 2023 : जागतिक वडा पाव दिवस 2023; वडा पाव कसा झाला मराठी माणसाचा ब्रँड?
  3. Yogasana For Hypertension : हायपरटेंशनच्या समस्येपासून मिळवा आराम; करा ही योगासने...
Last Updated : Aug 25, 2023, 7:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details