महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

कमी वयात केस पांढरे झाल्याने चिंतेत आहात? तर करा हे उपाय

आजकाल धूळ, प्रदूषण, ताण-तणाव किंवा अनुवंशिक आजारांमुळे कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. अकाली पांढऱ्या केसांना काही घरगुती उपाय करून केस काळे करता येतात. जाणून घ्या काही घरगुती उपाय.

White hair problems
पांढऱ्या केसांची समस्या

By

Published : Oct 27, 2022, 10:31 AM IST

तरुण वयातच केस पांढरे (white Hair) होण्याचे प्रमाण सध्या वेगाने वाढल्याचे दिसते. कधी कामाचा ताण म्हणून तर कधी आहारातून पोषण मिळत नसल्याने तर कधी आनुवंशिकता अशा एक ना अनेक कारणांनी पांढऱ्या केसांची समस्या उद्भवते. आजकाल धूळ, प्रदूषण, ताण-तणाव किंवा अनुवंशिक आजारांमुळे कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. पांढरे केस लपवण्यासाठी अनेक जण हेअर कलर, हेअर डायचा वापर करतात. मात्र त्यामध्ये असणाऱ्या केमिकलमुळे केस कमकुवत बनतात आणि केस गळतात. काही जणांना त्वचेची ॲलर्जी होते.

घरगुती उपाय- १) खोबरेल तेल :आवळ्याचे बारीक तुकडे गरम खोबरेल तेलात (Coconut Oil) मिक्स करुन केसांना लावा. खोबरेल तेलात लिंबाचा रस घालून हलक्या हाताने मालिश करा. त्यामुळे केस काळे आणि चमकदार होतील. २) ब्लॅक टी: ब्लॅक टीच्या (Black Tea) अर्काने केस धुवा. दोन दिवसांतून एकदा हे केल्याने फरक दिसून येईल.

३) आवळा:नियमित आवळा (Amla) खाण्याने सुद्धा केस काळे होतात. आवळ्याला मेंहदीमध्येसुद्धा मिसळून लावा. ४) पेरुची पाने:पेरुची पाने (Guava Leaves) वाटून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट केसांना लावा. ५) कोरफड:कोरफड (Aloe Vera) जेलमध्ये लिंबूचा रस टाकून पेस्ट बनवून केसांना आणि मुळांना लावा. हे नियमित लावल्याने पांढरे केस काळे होतील.

६) कडीपत्ता:मोहरीच्या तेलामध्ये कडीपत्ता (Kadipatta) उकळून घ्या. हे तेल नियमित रात्री झोपताना केसांना लावा. कडीपत्ता खोबरेल तेलात घालून रोज त्या तेलाने नियमितपणे केसांना मसाज करा. रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा.

७)रोज एक फळ खा: फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते हे आपल्याला माहित आहे. दिवसातून तुम्ही कोणतेही एक फळ खाल्ले तर तुमचे केस पांढरे होण्यापासून वाचवू शकता. फळांमुळे मेटाबॉलिझम चांगला राहण्यास मदत होते तसेच फळांमध्ये फायबर असल्याने शरीर डिट़ॉक्स व्हायला मदत होते. त्यामुळे न चुकता फळे खाणे संपूर्ण तब्येतीबरोबरच केसांसाठीही चांगले असते.

ABOUT THE AUTHOR

...view details