महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Happy Married Life Tips : वैवाहिक जीवनात सारखी चिडचिड होतेयं ? तर मग करा 'हे' उपाय

भारतीय संस्कृतीमध्ये लग्न म्हणजे नवरा-बायकोचे सात जन्माचे नाते मानले जाते. लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर स्वप्न असते. पती-पत्नीचे नाते अतिशय नाजूक मानले जाते. बऱ्याचदा नात्यात काही गोष्टींमुळे कटुता येते. हे नाते कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. एका क्षणाचाही अवलंब न करता तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन चिडचिड न करता आनंदाने जगू शकता.

By

Published : Jan 23, 2023, 4:20 PM IST

Happy Married Life Tips
वैवाहिक जीवनात सारखी चिडचिड होतेयं ?

हैदराबाद :नाते कोणतेही असो ते ताजे-तवाने ठेवायला हवे. नात्यातला गोडवा कायमस्वरूपी टिकणारा हवा. लग्न नवीन असेल तर एकमेकांना जाणून घेण्यात वेळ जातो. पण नक्की जोडीदाराचा स्वभाव कसा आहे हे माहिती नसल्याने वाद होतात. तसेच लग्नाला अनेक वर्ष झाल्यावरही एकमेकांची सवय होऊनही एकमेकांचे वागणे आवडत नाही. सततच्या भांडणामुळे मग नात्याचा कंटाळा येतो आणि सारखी चिडचिड होते. अशा परिस्थितीत तुम्ही खाली दिलेल्या गोष्टी जरूर पाळा.

स्पष्टपणे आणि वारंवार संवाद साधा : एखादी गोष्ट पटत नसेल तर ते स्पष्टपणे एकमेकांना सांगा. समजून घ्या आणि शांतपणे संवाद साधा. एकमेकांसाठी वेळ काढा : जर तुम्हाला तुमचे वैवाहिक नाते कायमस्वरूपी टिकवायचे असेल तर तुम्ही एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. अधिकाधिक वेळ घालवल्याने तुम्ही दोघेही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. त्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होते आणि गैरसमज दूर होतात. वैयक्तिक वेळेचे योजना करा : जोडीदारासोबतचा प्रत्येक क्षण एन्जॉय करा. स्वभाव रोमँटिक बनवा आणि जोडीदाराला डेटवर घेऊन जा. डेटवर जाऊन तुमच्या भुतकाळातील सुखद क्षणांना उजाळा द्या. घरी एकमेकांच्या आवडीचे पदार्थ बनवा.

असहमत असणे ठीक आहे : कधी-कधी नात्यामध्ये विविध कारणांमुळे कटुता येते. नाते रिफ्रेश होण्यासाठी आणि वैवाहिक जीवनातील कंटाळा घालवण्यासाठी तुमच्या स्वभावात बदल करा. एकाच गोष्टीवर दोघांचेही वेगळे मत असू शकते. एकमेकांच्या मताचा आदर करा. विश्वास निर्माण करा :सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जोडीदाराला विश्वासात घ्या. कुठल्याही नात्यात विश्वास असणे फार महत्वाचे आहे. क्षमा करायला शिका : एखाद्या प्रसंगी चूक झाली तर लगेच माफ करायला शिका. मनामध्ये कुठल्याही गोष्टी ठेवू नका.

वैवाहिक जीवनही रंगतदार होऊ शकते: महिला मानसिक पातळीवर खूप भावनिक असतात. तिला तुमच्याकडून शारीरिक संबंधापेक्षा प्रेमाची अपेक्षा असते. जर एखाद्या पुरुषाने तिला समजून घेतले आणि तिच्यावर प्रेम केले तर स्त्री तिच्या सर्व गोष्टींचा त्याग करते. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये भरपूर प्रणय असतो, पण लग्नानंतर काही दिवसांनी तो हळूहळू संपुष्टात येतो. तर तुमच्याकडे एक सोपा उपाय आहे. तुम्ही तुमचे जुने दिवस आठवून ते साजरे करू शकता, ज्यामुळे तुमचे वैवाहिक जीवनही रंगतदार होऊ शकते.

हेही वाचा :कसा साजरा करतात व्हॅलेंटाईन सप्ताह; वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details