महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

कॅफिनचे आवश्यक्ते पेक्षा अधिक सेवन 'या' घातक आजाराला देऊ शकते आमंत्रण

कॅफिनचे आवश्यक्ते पेक्षा अधिक सेवन (Caffeine Intake) हे नेहमीच आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते, मात्र अमेरिकन साइकियाट्रिक असोसिएशनद्वारे प्रकाशित मानसिक विकारांचे निदान आणि सांख्यिकी पुस्तिका (डीएमएम - 5) मध्ये असे आढळले आहे की, कॅफिन हे एंग्जायटी विकारांमध्ये देखील वाढ करते.

Caffeine etvbharat
कॅफिन सेवन फायदे

By

Published : Nov 24, 2021, 7:42 PM IST

Updated : Nov 24, 2021, 8:50 PM IST

कॅफिनचे आवश्यक्ते पेक्षा अधिक सेवानाचे धोके (Caffeine Intake) माहिती असून देखील जगभरात मोठ्या संख्येत लोक दररोज एकापेक्षा अधिक वेळा कॅफिनयुक्त पेय पदार्थांचे सेवन करतात. आकडे सांगतात की, दररोज 1.6 बिलियन कप पाण्यानंतर कॅफिनयुक्त पेय पदार्थ हे दुसरे सर्वाधिक खपणारे पेय पदार्थ असतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? की, कॅफिनचा अधिक वापर चिंता विकार वाढवू शकतो.

अमेरिकन साइकियाट्रिक असोसिएशनद्वारे प्रकाशित मानसिक विकारांचे निदान आणि सांख्यिकी पुस्तिकेमध्ये (डीएमएम - 5) सांगण्यात आले की, कॅफिन चिंता विकारांना ट्रिगर करू शकतो, ज्यामुळे पीडितांचे दैनंदिन कामकाजाही प्रभावित होऊ शकतात.

कॅफीन म्हणजे काय?

कॅफिन हे केंद्रीय मज्जासंस्था उत्तेजक आहे, आणि खूप अधिक प्रमाणात त्याचे सेवन केल्याने ते चिंतेच्या लक्षणांना वाढवण्याबरोबरच अनेक इतर समस्यांचे कारण देखील ठरू शकते.

सामान्यत: अनेक लोक जागे राहण्यासाठी आणि सावध राहण्यासाठी कॅफिन पितात, तर अनेक लोक सवयीमुळे देखील त्याचे सेवन करतात. अमेरिकेत केलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले की, जवळपास 85 टक्के लोकसंख्या दररोज किमान एक कॅफिनयुक्त पेय पिते.

चिंता विकार म्हणजेच एंग्जायटी म्हणजे काय?

हा एक मानसिक आजार आहे. यामध्ये व्यक्तीला भीती किंवा अस्वस्थता जाणवते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थचा (एनआईएमएच) असा अंदाज आहे की, यू.एस मध्ये सर्व प्रोढांमधील 31.1 टक्के प्रौढ आपल्या जिवनाच्या कोण्या टप्प्यावर चिंता विकार अनुभवतात. येथे एंग्जायटी डिसॉर्डर होणे आणि सामान्य चिंता होणे यात अंतर असतो, यावर लक्ष देणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत एंग्जायटी डिसॉर्डर असो किंवा सामान्य चिंता, कॅफिनचे सेवन दोन्ही परिस्थितींमध्ये मानसिक अवस्थेची गंभीरता वाढवू शकते.

कॅफिनमुळे चिंता का वाढते?

अमेरिकन साइकियाट्रिक असोसिएशनद्वारे प्रकाशित मानसिक विकारांचे निदान आणि सांख्यिकी पुस्तिकेमध्ये (डीएमएम - 5) शरीरावर कॅफिनच्या अनेक प्रभावांबाबत सांगण्यात आले आहे. ज्यांच्यानुसार, कॅफिनचे अधिक प्रमाणात सेवन आपल्या मुख्य यंत्रणांपैकी एक एडेनोसाइन रिसेप्टर्सना अवरोधित करते, ज्यामुळे डोपामाईन (Dopamine), नॉरअड्रेनालिन (Noradrenaline) आणि ग्लुटामेटचे (Glutamate) प्रमाण वाढते. परिणामी आपले कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम (Cardiovascular system) प्रभावित होते आणि व्यक्तीचा रक्तदाब आणि हृदय गती वाढते.

शरीरावर कॅफिनच्या परिणामाबाबत करण्यात आलेल्या अनुवांशिक अभ्यासात असे आढळून आले आहे की, एडेनोसिन रिसेप्टर (adenosine receptor) जीन चिंतेच्या विकासात एक महत्वाची भूमिका निभावते.

या अभ्यासाच्या निष्कर्षात शोधकर्त्यांनी सांगितले की, कॅफिनचे अधिक सेवन न केवळ व्यक्तींमध्ये चिंता विकाराचा धोका वाढवू शकते तर, त्यांना अधिक संवेदनशील देखील बनवू शकते. तेच केंद्रीय मज्जासंस्थामध्ये कॅफिनचा कमी डोस मोटर गतिविधी आणि सतर्कता सुधारू शकते. परंतु, संशोधक या क्षेत्रात अधिक आभ्यासाच्या आवश्यक्तेवरही भर देतात.

डीएसएम - 5 मध्ये कॅफिनच्या वापरासंबंधी डिसॉर्डरचा पत्ता लावण्यासाठी काही निकष दिले आहेत, जे खालील प्रमाणे आहेत.

- जेव्हा कॅफिनचा उपयोग कमी करणे किंवा न करण्याच्या प्रयत्नात यश मिळत नाही.

- कॅफिनमुळे शरीराला नुकसान झाल्यानंतरही त्याचा वापर सोडता न येणे.

- सोडल्यानंतर देखील कॅफिनच्या सेवनाची इच्छा होणे.

- कॅफिन प्रेरित चिंतेची लक्षणे.

डीएसएम - 5 मध्ये कॅफिनच्या अधिक प्रयोगामुळे होणारे विकार आणि एंग्जायटी वाढल्यावर आढळून येणारे लक्षण पुढील प्रमाणे आहे.

- मळमळ होणे.

- चक्कर येणे.

- शरीरात पाण्याची कमतरता.

- डोकेदुखी.

- अस्वस्थता, ताण.

- पल्स रेट वाढणे.

- झोप न येणे.

- भीती आणि अस्वस्थतेची भावना.

- जास्त चिंता.

- घाम येणे.

सुरक्षितपणे कॅफिनचे सेवन

कॅफीनच्या सेवनाबाबत करण्यात आलेले काही आभ्यास हे देखील सांगतात की, जर कॅफिनचे सेवन कमी किंवा मध्यम प्रमाणाते केले तर, त्याचे काही आरोग्य लाभ देखील आहेत जसे, मानसिक सतर्कता व एकाग्रता वाढणे, थकवा कमी होणे आणि अ‍ॅथलेटिक प्रदर्शनामध्ये सुधार. तसेच, वजन कमी करणे, मधुमेह, पार्किंसंस रोग आणि कॅन्सरचा धोका कमी होणे, आदी त्याचे कही अन्य लाभ असल्याचे मानले जाते.

याविषयी वर्ष 2012 मध्ये जारी करण्यात आलेल्या एका सूचनेत एफडीएकडून (FDA) अशी माहिती देण्यात आली होती की, निरोगी प्रौढांसाठी दररोज 400 मिलीग्रामपेक्षा कमी कॅफिनचे सेवन नुकसानदायक नाही. तेच यू.एस मध्ये 2014 च्या एका सर्वेक्षणाच्या परिणामांत असे दिसून आले की, सर्व वयाचे लोक दररोज 165 मिलीग्राम (1 - 2 कम कॉफी) कॅफिनचे सेवन करू शकतात.

डीएसएम - 5 नुसार, काही विशेष परिस्थितींमध्ये लोकांनी कॅफिनच्या सेवनाच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. त्या विशेष परिस्थिती पुढील प्रमाणे आहेत.

- गर्भावस्था किंवा स्तनपान करणे.

- निद्रानाश किंवा चिंता विकार.

- माइग्रेन किंवा जुनी डोकेदुखीची समस्या.

- पोटाचे विकार जसे, अल्सर.

- अनियमित हृदय गती.

- उच्च रक्तचाप.

काही उत्तेजक जसे अँटिबायोटिक्स, अस्थमाच्या औषधी आणि हृदयरोगसंबंधी औषधींचे सेवन करणे, यांचा त्यामध्ये समावेश आहे.

हेही वाचा -अल्झायमरपासून सावधान..! या आजाराने स्मरणशक्ती कमी होऊ शकते, तो 'या' कारणांनी होतो

Last Updated : Nov 24, 2021, 8:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details