कोविड १९ च्या लसीबद्दलचे सर्वसामान्य समज – गैरसमज
जवळ जवळ वर्षभर खूप वाट पाहिल्यानंतर आणि संयम बाळगल्यानंतर २०२१ ची सुरुवात भारतात लसीकरणाच्या मोहिमेची चांगली बातमी देऊन झाली.आरोग्य मंत्रालयाने देशात आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना मान्यता दिली – त्या म्हणजे कोविशिल्ट आणि कोव्हॅक्सिन.आणि आता प्रत्येक जण लस कधी टोचली जात आहे आणि आपण नेहमीच्या आयुष्याला निर्भयपणे कधी सुरुवात करू,याची आतुरतेने वाट पाहत आहेत.तरीही लस टोचून घेण्याची वाट पाहणाऱ्यांपैकी काही जणांच्या मनात लसीच्या रिअॅक्शनची आणि परिणामांची भीतीही आहे.काही खरे असले,तरी बऱ्याच अफवाही आहेत.म्हणून ई टीव्हीच्या सुखीभव टीमने यशोदा रुग्णालयाच्या जनरल फिजिशियन डॉ.एम.व्ही.राव यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे –
कोविड १९ लसीकरण सगळ्यांसाठी बंधनकारक आहे का?
कोविड १९ लसीकरण सगळ्यांसाठी बंधनकारक नाही.लोक स्वेच्छेने लस घेऊ शकतात.पण हे लक्षात घ्यायला हवे की ज्यांना कोविड होऊन गेला,त्यांच्या शरीरात कोविड विरोधात अँटिबाॅडीज तयार होऊ शकतात.त्यामुळे काही महिने कोविडपासून त्यांना संरक्षण मिळेल,पण ते कायमचे नाही.म्हणूनच कोविडला हरवण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम आणि खात्रीदायक उपाय आहे.
एखाद्या व्यक्तीने लस घेतली नाही, तर त्याचे काय परिणाम होतील?
डॉ.राव स्पष्ट करतात की विषाणूमध्ये बदल होऊ शकतो आणि विशेषत:वृद्ध लोक तसेच उच्च रक्तदाब,मधुमेह,कर्करोग यासारख्या रोगांमुळे पीडित लोकांमध्ये असंख्य आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.आणि कोविड १९ साठी अजून उपचार पद्धती मिळाली नसल्याने आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्यापेक्षा लस घेणे नक्कीच जास्त सुरक्षित आहे.
आता ज्या रुग्णाला कोविड १९ झाला आहे, तो ही लस घेऊ शकतो का?
नाही.लसीकरण करण्याआधी कोविड १९ ची लक्षणे आहेत का हे पाहणे महत्त्वाचे आहे.लक्षणे कमी झाली की लस टोचली जाते.समजा कोणाला कोविड १९ झाला असेल तर त्याला लसीकरणासाठी ४ ते ८ आठवडे थांबावे लागेल,नाही तर त्यांच्या आरोग्यामध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
लसीचे किती डोस आवश्यक आहेत?
दोन समान डोस २८ दिवसांच्या गॅपने घेणे गरजेचे आहे.एकच डोस घेतला तर कोविड १९ च्या विरोधात ६० ते ८० टक्के रोगप्रिकारक शक्ती विकसित होईल.त्यामुळे पूर्ण संरक्षणासाठी दोन डोस घ्यायला हवेतच.दुसरा डोस घ्यायला उशीर झाला तर मात्र त्वरा करावी लागेल.
नियमित घेतले जाणारे औषध आणि लस यांचा परस्परांशी काही संबध येण्याची शक्यता आहे का?
डॉ.राव सांगतात,कोविड १९ लस आणि नियमित घेतली जाणारी औषधे यांचा परस्पर संबंध येण्याची शक्यता नाही.पण स्टिरोइड्स किंवा तत्सम औषधे घेतली तर कदाचित लस तेवढ्या अँटिबाॅडीज तयार करू शकणार नाहीत.
ज्यांच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनी लस घ्यावी का?
ज्यांच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनी लस घेणे टाळावे.अर्थात,ते त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.
गरोदर महिला किंवा स्तनपान देणाऱ्या महिला लस घेऊ शकतात का?