व्हर्च्युअल डेटिंग ही अगदीच निरर्थक नाही. तुमचा प्रियकर परदेशात अथवा दूर शहरात राहत असल्यास व्हर्चुअल डेटिंग सारखे प्रभावी माध्यम नाही. व्हर्चुअल डेटिंगद्वारे बाँडिंग सुधारता येते. यामुळे आपण व्हर्चुअलरित्या एकमेकांशी जोडतो. आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी व्हर्चुअल डेटिंग करण्याकरिता या टिप्स वाचा
व्हर्च्युअल पिलो टॉक
व्हर्च्युअल पिलो टॉकसह शक्तिशाली ऑक्सिटोसिन, प्रेम संप्रेरक तयार होतात. म्हणजे घरी उशी समजून आपल्या प्रियकराशी बोला. येथे संभाषण हे मुख्य केंद्रस्थानी आहे. यामुळे तुम्ही हजारो मैल अंतरावर असलात तरीही तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध विकसित होतील. बोलण्यात गुंतल्याने तुमच्या इच्छा वाढू शकतात. आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी बोलावेसे वाटते.
व्हर्च्युअल कॅंडललाइट डिनर
ही एक मनोरंजक कल्पना आहे. व्हर्चुअल कँडललाईट डिनर करा. तुमच्या जोडीदाराला स्पेशल फील करण्यासाठी रोमँटिक टोन सेट करा. स्वत:च्या हाताने जेवण बनवा. यामुळे तुमच्या जोडीदारालाही स्पेशल फील होईल
मानसिक वाचन
व्हर्च्युअल टॅरो रीडिंगद्वारे नातेसंबंधांबद्दल आपल्या जोडीदाराच्या लपलेल्या अंतर्ज्ञानाचा शोध ध्या. आणि त्याच्याशी कनेक्ट करून त्याच्या मनात काय सुरू आहे याबद्दल समजून घ्या.
व्हर्चुअल चित्र काढा
हे इमोटिकॉन्स आणि मूलभूत व्हिडिओ चॅट्सपेक्षा जास्त प्रभावी असते. तुमच्या जोडीदारासोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. तुमचा पेंटिंग ब्रश, चित्रफलक आणि पेंट्स गोळा करा आणि चित्र काढा. यासाठी तुम्ही चांगले कलाकार असण्याची गरज नाही.
व्हर्चुअल ट्रिप