हैदराबाद : उन्हाळ्यात उकाड्याचा प्रचंड त्रास होऊन नागरिकांना उन्हाळा नकोसा होतो. उकाड्यामुळे नागरिकांना डिहायड्रेशन होऊन लवकर थकवा येतो. आपल्या शरीराला उन्हाळ्यात ताजेतवाने ठेवण्यासाठी हंगामी उन्हाळी फळांपेक्षा आपल्या शरीराला पुन्हा ऊर्जा देण्याचा चांगला मार्ग दुसरा कोणता नाही. त्यामुळे टरबूज हे असेच हंगामी फळ असून त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचा उपयोग उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करण्यासाठी विविध प्रकारे केला जातो. या उन्हाळ्याच्या हंगामात तुम्ही घरबसल्या मस्त टरबूज पेय बनवू शकता.
टरबूज स्ट्रॉबेरी स्मूदी :उन्हाळ्याच्या दिवसात टरबूजाची स्ट्रॉबेरी स्मूदी तुम्ही बनवू शकता. ही स्मूदी ताजीतवानी असून तुम्हाला दिवसभर उत्साही राहण्यास मदत करते. टरबूज स्ट्रॉबेरी स्मूदी आरोग्यदायी पोषक तत्वांनी भरलेली असते. ती ताजी स्ट्रॉबेरी, टरबूज, मध आणि कमी चरबीयुक्त योगर्टने बनवलेली असते. या उन्हाळ्यात ही स्मूदी नक्की वापरून पहा.
टरबूज मोजिटो :उन्हाळ्यात टरबुजापासून मोजिटो बनवण्यात येतो. मोजिटो उन्हाळ्याच्या हंगामासाठी योग्य आहे. ताजे टरबूज, पुदिना मोजिटो बनवण्यासाठी वापरले जाते. हे नैसर्गिकरित्या गोड असून आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे.