यवतमाळ - कोरोना हा प्रामुख्याने श्वसनाचा आजार आहे. फटाके प्रदूषण यामुळे हा आजाराचा व इतर अनेक आजाराचा धोका बळावतो. याचा आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणाम जाणून यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात येणाऱ्या सुकळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी व पालकांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला आहे. विद्यार्थ्यांनी वर्गात स्वतः संकल्प घेऊन घरोघरी संकल्पपत्र, प्रदूषणमुक्त दिवाळी पोस्टर लावून जनजागृती केली.
फटाकेमुक्त दिवाळीचा विद्यार्थ्यांकडून संकल्प; कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम
बाल मनापासूनच फटाकेमुक्त आणि प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे सवय लागली, तर भविष्यात निसर्गामध्ये होणारे प्रदूषण टाळता येते. कोरोनाच्या काळात प्रदूषण टाळून या आजाराला पुन्हा आटोक्यात आणता येईल, यासाठीच या शाळेचा चिमुकल्यांचा आटोकाट प्रयत्न होता.
विद्यार्थ्यांनी घेतली शपथ -
शाळेतील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. तसेच गावातील प्रत्येक घरी जाऊन या वर्षी प्रदूषण होणार नाही यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन चिमुकल्यांनी घरोघरी जाऊन केले. बाल मनापासूनच फटाकेमुक्त आणि प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे सवय लागली, तर भविष्यात निसर्गामध्ये होणारे प्रदूषण टाळता येते. कोरोनाच्या काळात प्रदूषण टाळून या आजाराला पुन्हा आटोक्यात आणता येईल, यासाठीच या शाळेचा चिमुकल्यांचा आटोकाट प्रयत्न होता.