यवतमाळ- वेतन मिळवून दिल्याचा मोबदला म्हणून ५ हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. उमरखेड वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक कार्यालयातील लेखापाल व वन संरक्षकाला यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
प्रलंबित वेतन मिळवून दिल्याबद्दल लाच मागणारे दोघे यवतमाळ एसीबीच्या जाळ्यात
उमरखेड येथील लेखापाल अरविंद रामराव आगलावे (४१) आणि वनरक्षक संजय सुदामराव ठाकरे (५३) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनी तक्रारदारास ५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
उमरखेड येथील लेखापाल अरविंद रामराव आगलावे (४१), आणि वनरक्षक संजय सुदामराव ठाकरे (५३) दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनी तक्रारदारास २०१९ सालातील मार्च ते मे महिन्याचे वेतन काढून दिल्याचा मोबदला म्हणून ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार एसीबीला मिळाली आहे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी लाचेचा ३ हजाराचा पहिला टप्पा घेताना दोघांना एसीबीने अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.